भाजपला ओबीसींचा आताच पुळका का ? : सुषमा अंधारे | पुढारी

भाजपला ओबीसींचा आताच पुळका का ? : सुषमा अंधारे

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : भाजपला ओबीसींचा पुळका आताच का आला, हा त्यांचा दुटप्पीपणा आहे. ओबीसींचे हित हवे होते तर ओबीसींच्या जनगणनेचा मुद्दा मागे का पडला ? राज्य, राष्ट्रीय पातळीवर अनेक ओबीसी नेत्यांना त्यांनी का डावलले, असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज (दि. २५) नागपुरात माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

राहुल गांधी यांची सतत ‘पप्पू’ म्हणून हेटाळणी झाली. या इमेज मधून त्यांनी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने देशभरात सर्वसामान्यांमध्ये विश्वास निर्माण केला. मुळात त्यांना आता उपेक्षित करता येत नाही, हे भाजपला कळले आहे. यातूनच हा सर्व प्रकार सुरू असल्याचा आरोप अंधारे यांनी केला. मुळात त्यांनी हे विधान ज्यावेळी केले. तेव्हा कारवाई न करता आताच कारवाई करण्याचे सरकारला का सुचले ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अदानी यांचे हितरक्षण करणे सरकारला महत्त्वाचे वाटते हिडनबर्ग प्रकरणात उत्तर सरकारला देता आले नाही, हे सरकारचे अपयश आहे.

सतत चार दिवस राहुल गांधी भाजपला या संदर्भात उत्तर मागत होते. या कारवाईने भाजपचा हिटलरी चेहरा उघड झाला. घोटाळे उघड करणारे सर्व दृष्ट तर सरकार आणण्याकामी मदत करणारे सर्व चांगले हा त्यांचा दुटप्पीपणा आहे. गेले अनेक दिवस खासदार नवनीत राणा आमदार बच्चू कडू, सुधीर पारवे, संतोष बांगर, सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे, अब्दुल सत्तार असे अनेकांच्या प्रकरणांमध्ये कारवाईसाठी चालढकल करणाऱ्या भाजपने या प्रकरणात मात्र, तातडीने कारवाई केली. यातच सर्व आले, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा 

Back to top button