Dadpe Pohe : दडपे पोहे कसे कराल? | पुढारी

Dadpe Pohe : दडपे पोहे कसे कराल?

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘दडपे पोहे’ ही पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. दडप्या पोह्यांमध्ये (Dadpe Pohe) नारळाचा ‘रोल’ हा महत्वाचा आहे. त्यामुळे कोकणात दडपे पोहे खाल्लात की, त्याची चव काही निराळीच असते. हे पोहे जास्त तेलकट नसतात. त्यामुळे डाइट करणाऱ्यांना दडपे पोहे खाणे कधीही चांगले. दडपे पोहे करण्याची पद्धतही सोपी आहे.चला तर दडपे पोह्यांची रेसिपी आपण पाहू…

Dadpe Pohe

साहित्य 

१) पाव किलो पातळ पोहे

२) बारीक चिरलेले दोन मध्यम कांदे

३) बारीक चिरलेल्या दोन काकड्या

४) बारीक चिरलेल्या पाच हिरव्या मिरच्या

५) एक कप चिरलेली कोथिंबीर

६) अर्धी वाटी दाण्याचे कूट

७) अर्धा वाटी खोवलेलं ओलं नारळ

८) दोन टिप्सून साखर

९) अर्ध्या लिंबाचा रस, चवीनुसार मीठ

१०) एक-दोन टेबलस्पून तेल, मोहरी, हिंग

Dadpe Pohe

कृती 

१) मध्यम गॅसवर कढई ठेवून त्यात पोहे घाला. ते कुरकुरीत भाजून घ्या. भाजल्यानंतर एक भांड्यात हे भाजलेले पोहे काढून घ्या.

२) त्या पोह्यांवर चिरलेला कांदा, काकडी, कोथिंबीर, साखर, मीठ, दाण्याचं कूट आणि खोवलेलं ओलं खोबरं घाला.

३) पुन्हा गॅसवर कढई ठेवून त्यात तेल गरम करून घ्या. ते व्यवस्थित तापलं की, त्यात मोहरी टाका. मोहरी तडतडल्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला. दोन्हींचं मिश्रण चांगलं परतवून घ्या.

४) त्यानंतर हिंग घालून गॅस बंग करा. ही फोडणी नंतर पोह्यांवर टाका. त्यानंतर हलक्या हातानं व्यवस्थितपणे मिक्स करा. अशा पद्धतीने दडपे पोहे तयार झाले.

५) या दडप्या पोह्यांवर (Dadpe Pohe) आवडीनुसार पापड कुस्करून घालू शकता. इतकंच नाही तर लोणच्याचं खार किंवा लिंबूचा रसही घालू शकता.

पहा व्हिडीओ : १० मिनिटांत बनवा उपवासाचे फराळी पकोडे

या रेसिपी वाचल्यात का ?

Back to top button