Sonam Kapoor : सफेद रंगाच्या आउटफिटमध्ये सोनम कपूर, पण चाहत्यांनी घेतला चांगलाच क्लास ! | पुढारी

Sonam Kapoor : सफेद रंगाच्या आउटफिटमध्ये सोनम कपूर, पण चाहत्यांनी घेतला चांगलाच क्लास !

मुंबई; पुढारी ऑनलाईन: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) नेहमी आपले हॉट फोटो आणि व्हिडिओ शेअर करून सक्रीय असते. सध्या सोनम कपूर (Sonam Kapoor) हिचा हटके अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे.

नुकतेच सोनम कपूरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सोमनने सफेद पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये (आउटफिट) दिसत आहे. या फोटोत सोनमच्या ड्रेसवर महिलेच्या शरीराची प्रतिकृती असल्याचे दिसत आहे.

याशिवाय तिने लाल लिपस्टिकसोबत सुंदर कानातले घातले आहेत. या फोटोत सोनम खूपच वेगळी दिसत आहे. हा तिचा लूक चाहत्यांना फारसा आवडलेला नाही.

हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच सोनमला चाहत्यांनी ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. याच एका नेटकऱ्यांने ‘पैसे नाहीत म्हणून पडदा घातलास काय?’, तर दुसऱ्याने ‘तुला रात्री कोणीतरी पाहून घाबरेल’, तर कोणी सोनमला ‘ड्रामेबाज’ म्हटले आहे.

याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने सोनम कपूरची तुलना रणवीर सिंहशी केली आहे. कारण सोनमचा हा लूक रणवीर सिंहने केलेल्या अंतरंगी लूकसारखा असल्याचे म्हटले जात आहे.

आधाही सोनम कपूरने आपले लाल रंगाच्या ड्रेसमधील हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोत ती लाल परिसारखी दिसत होती. गेल्या काही दिवसांत सोनम तिची बहिण रियाच्या लग्नात पोहोटली होती. तेव्हा नेटकऱ्यांनी तिच्या प्रेंग्नसीबद्दल अनेक तर्कवितर्क लावले होते.

सोनम कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिचा ‘द झोया फॅक्टर’ हा चित्रपट २०१९ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.

हेही वाचलंत का?

Back to top button