Mla Dilip Mohite : ‘शरद पवारांचा अनादर करणाऱ्या अध्यक्षांची दुकानदारी जनतेसमोर मांडणार’

Mla Dilip Mohite : ‘शरद पवारांचा अनादर करणाऱ्या अध्यक्षांची दुकानदारी जनतेसमोर मांडणार’
Published on
Updated on

विविध प्रकारचा निधी देऊन सहकार्य करणारे ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार यांना संस्थेच्या वार्षिक अहवालात टाळल्याचा आरोप करून खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा अनागोंदी कारभार जनतेसमोर आणणार असल्याची टीका खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते (Mla Dilip Mohite) यांनी केली.

लोकांच्या पैशावर उभारलेल्या संस्थेचे गेल्या ४७ वर्षात कोणतेही भरीव कार्य नाही. उलट मालकी हक्क असल्याचा आव आणून या माध्यमातून काहींचे प्रपंच सुरु आहेत. याविरोधात विधानसभेच्या येत्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचा इशारा (Mla Dilip Mohite) पाटील यांनी दिला.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार साहेबराव बुट्टे पाटील यांचे पुत्र देवेंद्र बुट्टे पाटील व संचालक मंडळाविरोधात रविवारी (दि. ३) पत्रकार परिषदेत मोहिते बोलत होते.

Khed MLA Dilip Mohite : आठ हजार विद्यार्थी असलेली संस्था

संस्थेच्या संचालक मंडळात माजी आमदार स्व. साहेबराव सातकर यांचे नातेवाईक व समर्थकांचे वर्चस्व असल्याचा मुद्दा मोहिते पाटील यांनी अधोरेखित केला.विशेष म्हणजे मोहिते यांनी आरोप व टीका केलेले अध्यक्ष व संचालक मंडळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि जेष्ठ नेते शरद पवार यांना मानणारे आहेत.

खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून हुतात्मा राजगुरू महाविद्यालय व पाच वर्षापूर्वी पासून स्व साहेबराव बुट्टे पाटील महाविद्यालय चालवले जाते. सुमारे आठ हजारावर विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. खेड तालुक्यात सर्वात जुना इतिहास असलेली आणि मोठी अशी ही शिक्षण संस्था आहे. राजकीय वलय असलेले संचालक मंडळ येथे गेली चाळीस वर्षे अस्तित्वात आहे. त्यातही माजी आमदार साहेबराव बुट्टे पाटील, त्यानंतर काही काळ माजी आमदार राम कांडगे आणि गेली पंचवीस देवेंद्र बुट्टे पाटील अध्यक्ष आहेत.

आमदार दिलीप पाटील यांची संस्थापकांवर टिका

नुकतीच ३० सप्टेंबरला सर्वसाधारण सभा होऊन त्यात पुन्हा देवेंद्र पाटील यांना अध्यक्षपदी निवडण्यात आले. दोन दिवसांनी संचालक मंडळ जाहीर झाले. या निवडीच्या सभेला आमदार मोहिते पाटील यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते, तरीही ते सभेला उपस्थित होते.
सभेत माजी आमदार साहेबराव सातकर यांचे संस्थेसाठी मोठे व मोलाचे योगदान असल्याने त्यांचे पुत्र हिरामण सातकर यांना अध्यक्षपदाची संधी द्यावी असा आग्रह मोहिते पाटील यांनी धरला, मात्र उपस्थित केलेले त्यांचे मुद्दे विचारात घेतले नाही. याशिवाय संचालक मंडळ निवडताना संपर्क केला नाही. यावरून आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली.

त्यात अनेक आरोप करून देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, संस्थेकडे कोट्यावधी रुपये शिल्लक असताना कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालया पलीकडे कोणतेही वाढीव दालन अध्यक्षाला उभे करता आले नाही. नुसत्या पदवी अभ्यासक्रमातून यांनी तालुक्यात सुशिक्षित बेरोजगार वाढवण्याचे काम केले. रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या नाही. गेल्या पाच वर्षात दुसरे महाविद्यालय सुरु झाले. किमान दोन किमी अंतर गरजेचे असताना एकाच आवारात दोन महाविद्यालय सुरु आहेत. पाईट येथे परवानगी असताना राजगुरुनगरला कॉलेज चालवले जाते.ॉ

पाच वर्षे महाविद्यालयास प्राचार्य नाही

विनाअनुदानीत असलेल्या या संस्थेत विद्यार्थ्यांचे विना पावती पैसे घेतले जातात. ही इमारत अनधिकृत असून लगतच्या जागांवर अतिक्रमण केले आहे. शिक्षक भरती करताना मोठ्या रकमा घेतल्या जातात त्याची संचालक मंडळात वाटणी होते. मागील काळात कॉलेजसाठी साहित्य खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला. त्याच्या चौकशी वरून काही संचालक राजीनामा देऊन घरी गेले. हा पैसा कुठे मुरला? अध्यक्ष व ठराविक संचालक दिवसभर कॉलेजमध्ये बसून असतात. त्यांच्या हस्तक्षेपामुळे व्यवस्थापनाला आपले काम करता येत नाही. गेली पाच वर्षे प्राचार्य नाही. असे विविध प्रश्न मोहिते पाटील (Mla Dilip Mohite) यांनी उपस्थित केले.

नव्याने सुरु केलेल्या महाविद्यालयाला साहेबराव बुट्टे पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. ते पहिल्या कॉलेजच्या नावातील बलिदान कर्त्या हुतात्मा राजगुरू यांच्या इतके मोठे आहेत का? ज्यांनी जमिनी दिल्या, पैसे दिले त्यांचा यांना का विसर पडला? असाही प्रश्न उपस्थित केला.

शरद पवारांचे नाव घेऊन आमदार होता येणार नाही

खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वेळोवेळी सहकार्य केले आहे. प्रत्येक उत्सव, कार्यक्रमात उपस्थित राहून प्रोत्साहन दिले. पवार यांच्या उपस्थितीने अध्यक्ष आणि संचालक हुरळून गेले आहेत. त्यांना डावलले तरी कोणी वाकडे करणार नाही. ते सांगतील तेव्हा येतात त्यामुळे कधी ना कधी आपण आमदार होऊ असा काहींचा भ्रम निर्माण झाला आहे. मात्र नुसते एवढ्याने आमदार होता येणार नाही त्यासाठी स्वखर्चाने लोकांमध्ये यावे लागते अशी टीकाही आ.दिलीप मोहिते पाटील (Mla Dilip Mohite) यांनी केली आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news