तोतया आयकर अधिकाऱ्याने केली सराफाची फसवणूक | पुढारी

तोतया आयकर अधिकाऱ्याने केली सराफाची फसवणूक

भंडारा, पुढारी ऑनलाईन : आयकर विभागाचा अधिकारी असल्याचे सांगून भंडाऱ्यातील एका सराफा व्यापाऱ्याची १ लाख, ३३ हजारांनी फसवणूक केली. (सराफाची फसवणूक) या तोतया आयकर अधिकाऱ्याचा पोलिस शोध घेत आहेत.

शहरातील कमला हाऊस येथील अनादिनारायण ज्वेलर्स येथे संतोष पी़ नामक व्यक्ती आला.

आपण आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून दुकानातून २७४९ ग्रॅम वजनाचे एक सोन्याची चेन आणि दोन अंगठ्या असा १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल खरेदी केला. ( सराफाची फसवणूक )

त्याचे पैसे एनईएफटीच्या माध्यमातून पाठविल्याचे मोबाईलवर स्क्रीन शॉट काढून दाखविले. ( सराफाची फसवणूक )

खरेदी केलेल्या दागिन्यापैकी सोन्याची एक चेन २५४९ ग्रॅमची होती. त्याची किंमत १ लाख, ३३ हजार, २१८ रुपयाची होती.

ऑर्डर दिलेल्या दोन अंगठ्या रविवारी घेवून जातो, असे त्याने सांगितले.

तसेच त्याच दिवशी खरेदी केलेल्या सोन्याचे बिल पण घेऊन जातो असे सांगितले.

सराफा व्यापारी करण सोनी यांनी आपल्या बँकेचे स्टेटमेंट बघितले असता खात्यावर पैसेच जमा झाले नसल्याचे दिसून आले.

त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी भंडारा पोलिसात तक्रार दाखल केली.

भंडारा पोलिसांनी तोतया आयकर अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जगणे हे करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button