मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मध्यरात्री मुंबईला पावसाने झोडपले. अनंत चतुर्दशी दिवशी (रविवार) दुपारी पावसाने चांगलाच जोर धरला. पूर्व उपनगरात गेल्या २४ तासांत तब्बल १११.५८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. नेमके अनंत चतुर्दशी दिवशी मुंबईला पावसाने झोडपले. दरम्यान, सकाळी पावसाने विश्रांती घेतल्याने चाकरमान्यांना पाणी तुंबण्याच्या समस्येपासून दिलासा मिळाला.
हवामान विभागाने सोमवारी शहर व उपनगरांमध्ये heavy rain मध्यम व काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच समुद्रामध्ये सकाळी आणि रात्री उंच लाटा उसळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यात मुंबईत सकाळी ११.४४ वाजता ४.४० मीटर उंच, तर मध्यरात्री ११.५९ वाजता ४.२५ मीटर उंच लाटा उसळतील, असे मुंबई महापालिकेने सांगितले. याउलट सायंकाळी ५.५० वाजता ०.९२ मीटर उंच असतील.
मुंबई मनपाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत पूर्व उपनगरात सरासरी १०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत शहरात ७८.५९ मिमी, पूर्व उपनगरात १११.५८ मिमी आणि पश्चिम उपनगरात ८८.१५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.