अनिल देशमुखांच्या घर, कॉलेजवर आयकर विभागाची छापेमारी!

Anil Deshmukh
Anil Deshmukh

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर पुन्हा एकदा छापेमारी करण्यात आली आहे. सकाळी 11.30 वाजता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर, मुंबई, तसंच त्यांच्या मालकीच्या कॉलेजवर आयकर विभागाने छापे टाकले. नागपुरातील निवासस्थान, नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील निवासस्थान, मुंबईतील ज्ञानेश्वरी निवासस्थान, NIT कॉलेजवर आयकर विभागाने छापा टाकून झाडाझडती केली.

अनिल देशमुख सध्या नागपुरात नाहीत. यापूर्वी दोन वेळा ईडी आणि सीबीआयने धाडी टाकल्या होत्या. आता दिल्ली आणि मुंबई येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकून चौकशी सुरु केली आहे अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

हेही वाचलत का :

अभिनेत्री प्रार्थना बेहरे बनवतेय गणपती स्पेशल गाजराची खीर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news