flyover collapses : मुंबईत फ्लायओव्हरचा भाग कोसळला, १४ जखमी

flyover collapses : मुंबईत फ्लायओव्हरचा भाग कोसळला, १४ जखमी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : (flyover collapses in Mumbai) वांद्रे (पूर्व), एमटीएनएल जंक्शन, ट्रेड सेंटर, बीकेसी (BKC) या ठिकाणी असलेला निर्माणाधीन उड्डाणपुलाचा गर्डर शुक्रवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास अचानक कोसळला. (flyover collapses in Mumbai) या दुर्घटनेत १४ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेतले.

सर्व जखमींना मुंबई महापालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे व्ही. एन. देसाई रुग्णालयाचे डॉक्टर शशांक यांनी सांगितले.

ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेत जखमी असलेले हे सर्वजण कामगार असल्याची माहिती आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचावकार्य सुरु केल्याने २१ जणांचे प्राण वाचले आहेत. दुर्घटना घडली तेव्हा कामगार पुलाच्या वर आणि खाली काम करत होते.

दुर्घटना घडल्यानंतर पुलाच्या वर काम करत असलेल्या कामगारांनी जीव वाचवण्याचे प्रयत्न केले. काही जणांनी सळ्यांचा आधार घेतला तर काही जणांनी पुलावरुन उडी मारुन जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.

अनिल सिंग, अरविंद सिंग, अझर अली, मुस्ताफ अली, रियाझुद्दीन, मोतलाब अली, रियाझू अली, श्रावण, अतीश अली, रलिस अली, अझिझ उल हक, परवेझ, अकबर अली, श्रीमंद अशी या घटनेत जखमी झालेल्यांची नावे आहेत.

हा पूल कसा कोसळला, या संदर्भात चौकशी करण्याची मागणी करण्यात येत असून, कंत्राटदार कंपनीवर कारवाई करण्याची मागणी, जखमीच्या नातेवाईकांनी केली आहे.

घटनेची चौकशी सुरु

एमएमआरडीए ट्रेडिशनल कमिशनर एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी म्हटले आहे की, १४ जखमींपैंकी १ गंभीर आहे. पुलाचा कोसळलेल्या भाग वळण असल्याने स्टीलचा बनविण्यात आला होता. कोसळलेल्या कारणांची चौकशी करण्यात येईल.

flyover collapses : मुंबईत फ्लायओव्हरचा भाग कोसळला, १४ जखमी

[visual_portfolio id="39086"]

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news