अमरावती: स्त्री रुग्णालयातील आगीत जखमी झालेल्‍या बालकाचा मृत्यू | पुढारी

अमरावती: स्त्री रुग्णालयातील आगीत जखमी झालेल्‍या बालकाचा मृत्यू

अमरावती;पुढारी वृत्तसेवा: येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील बेबी केअर सेंटरमध्ये रविवारी (दि.२५) सकाळी आग लागली होती. या आगीत जखमी झालेल्या बालकांमधील एका बालकाचा मृत्यू झाला आहे. रूग्णालयातील शॉर्टसर्किटमुळे स्फोट झाल्याने बेबी केअर सेंटरमध्ये आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यावेळी सेंटरमध्ये 35 नवजात बालके होती. त्यातील एक बाळ धुरामुळे दगावल्याची माहिती समोर आली आहे.

शॉर्टसर्किटमुळे जिल्हा स्री रुग्णालयातील बेबी केअर सेंटरला आग लागल्याने खळबळ उडाली होती. अग्निशमन दलाच्या दोन बंबांच्या साह्याने ही आग विझवण्यात आली. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांनी प्रसंगसावधानता दाखवत बेबी केअर सेंटरमधील 35 बाळांना सुरक्षितपणे बाहेर काढले. दरम्यान दोन बाळांची प्रकृती नाजूक असल्यामुळे त्यांना डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले होते. इतर बालकांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र गंभीर प्रकृती असलेल्या बालकामधील एका बालकाचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा:

Back to top button