Taliban vs China : तालिबानचा चीनवर ‘डिजिटल स्ट्राइक’! | पुढारी

Taliban vs China : तालिबानचा चीनवर ‘डिजिटल स्ट्राइक’!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Taliban vs China : अफगाणिस्तानच्या स्वयंघोषित तालिबान सरकारने चीनवर डिजिटल स्ट्राइक सुरू केला आहे. तालीबान सरकारने पाकिस्तानचे मित्र राष्ट्र असणा-या चीनच्या लोकप्रिय अॅप्सवर बंदी घालण्यास सुरुवात केली आहे. PUBG मोबाईल म्हणून ओळख असणा-या प्लेयरअननोन बॅटलग्राउंड (PlayerUnknown’s Battlegrounds)च्या मोबाईल आवृत्तीवर बंदी घालण्यात आल्याची घोषणा तालिबानकडून करण्यात आली आहे.

बंदी का घातली?

PUBG मोबाईल आणि टिकटॉकवर बंदी घालण्यामागे तालिबानने दिलेला युक्तिवाद ऐकून हसायला येईल. एकीकडे जगभरातून तालिबानवर हिंसाचार पसरवल्याचा आरोप करण्यात येतो. पण तालिबानच्या मते PUBG मोबाईल देशात हिंसाचाराला प्रोत्साहन देत आहे, त्यामुळे त्यावर बंदी घालण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानचे दूरसंचार मंत्री आणि शरिया कायदा अंमलबजावणी प्रशासन यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर तालिबानने येत्या 90 दिवसांत देशात PUBG आणि TikTok सारख्या चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. अफगाणिस्तान सरकारने देशातील दूरसंचार आणि इंटरनेट सेवा प्रदात्यांना PUBG मोबाइल आणि TikTok वर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. (Taliban vs China talibans digital strike on china)

तालिबानने 23 लाख वेबसाइट्सवर घातली बंदी

TikTok आणि PUBG मोबाईलवर बंदी घालण्यापूर्वी अफगाण सरकारने 23 लाख वेबसाइट्सवर बंदी घातली आहे. या वेबसाइट्स चुकीची माहिती प्रसारीत करत असल्याचा तालिबानने युक्तिवाद केला आहे. (Taliban vs China talibans digital strike on china)

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच अफगाणिस्तानच्या एक ट्रिलियन डॉलर्सच्या खनिज संपत्तीवर डोळा ठेवणाऱ्या चीनचे तालिबानने आपला ‘मित्र’ म्हणून स्वागत केले होते. अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीत चीनच्या गुंतवणुकीवर लवकरात लवकर चर्चा करायची आहे, असेही तालिबानने म्हटले होते. तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी एक दावा करत अगगाणिस्तानच्या 85 टक्के भूभागावर आमच्या गटाचे नियंत्रण असल्याचे सांगितले होते. तर उइघूर मुस्लिमांबाबतच्या धोरणाचे चीनच्या बाजूने तालिबान समर्थन करून ड्रॅगनविरोधी उइघूर मुस्लिमांना अफगाणिस्तानमध्ये आश्रय देणार नसल्याचे तालिबानने स्पष्ट केले होते.

Back to top button