

खोर : येथील बाळासाहेेब सीताराम चौधरी (वय 62) यांचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. याबाबत माहिती अशी की, बाळासाहेब हे वढणे (ता. बारामती) हद्दीत असलेल्या त्यांच्या शेतात बाजरीला पाणी देण्यासाठी गेले होते. दिवसभर लाईट नसल्याने व रात्रीच्या वेळी लाईट असल्याने ते 10 च्या सुमारास शेतात पाणी देत असताना अचानक सापावर पाय पडला आणि त्यांना सापाने दंश केला. त्यांना तत्काळ यवत येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
मात्र, वेदना असह्य होत असल्याने त्यांना पुढे ससून हॉस्पिटल, पुणे येथे हलविण्यात आले. ससून हॉस्पिटलमध्ये गेली 15 दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते. मात्र, अखेर बाळासाहेब चौधरी यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली गेली. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.