डोंबिवली : भर पावसाळ्यात पाण्यासाठी आंदोलन; 9 लाख एमएलडी पाणी देण्याचे मान्य | पुढारी

डोंबिवली : भर पावसाळ्यात पाण्यासाठी आंदोलन; 9 लाख एमएलडी पाणी देण्याचे मान्य

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : भर पावसात पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने कल्याण येथील खडकपाडा परिसरातील गोदरेज सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी मंगळवारी (दि.२०) रोजी दुपारी आंदोलन केले. यावेळी अधिकाऱ्यांनी ९ लाख एमएलडी पाणी देण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.

कल्याण येथील खडकपाडा परिसरात गोदरेज सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये जवळपास अडीच हजार रहिवाशी राहतात. त्यामुळे या सोसायटीमध्ये १४ लाख एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र, केवळ ३ ते ४ लाख एमएलडी पाणी मिळत असल्याने नागरिक हैराण झाले होते. वारंवार तक्रारी करून देखील पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने अखेर पालिकेच्या प्रभाग कार्यालयात मंगळवारी दुपारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या रहिवाशांनी मोर्चा काढला. त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी ९ लाख एमएलडीपर्यंत पाणी देण्याचे आश्वासन या रहिवाशांना दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button