जयंत पाटील म्‍हणाले, केंद्राकडून ईडी, सीबीआयचा गैरवापर | पुढारी

जयंत पाटील म्‍हणाले, केंद्राकडून ईडी, सीबीआयचा गैरवापर

जळगांव ; पुढारी वृत्‍तसेवा :  केंद्र सरकार सीबीआयच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे. कोणतीही चूक त्यांना नामोहरण करण्याचा प्रयत्न करीत आहे. विरोधकांवर दबाव तंत्र निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार ईडीचा गैरवापर करीत आहे. एकनाथ खडसे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे, असे प्रतिपादन मंत्री जयंत पाटील यांनी केले. चाळीसगाव येथे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आले असता ते बाेलत हाेते

चाळीसगाव, पाचोरा आणि भडगाव तालुक्यात  ३० व ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे  ३८ गावांना जबर फटका बसला आहे. यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. तर कन्नड घाटातील वाहतूक अद्‍याप सुरळीत झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पंचनामे योग्य पद्धतीने करण्याच्या सूचना पाटील यांनी केली.

जळगाव शहरातील नदीमध्ये अतिक्रमण व सुशोभीकरणाच्या नावाखाली जे अतिरिक्त बांधकाम झाले आहे ते काढण्याचे आदेश नामदार पाटील यांनी दिले. गावात व शहरात नदीकाठावर संरक्षक भिंती बांधण्याचे आदेश त्‍यांनी दिले.

यावेळी पाहणी करण्याआधी पाटील म्हणाले की, ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ईडी च्या माध्यमातून देशात विरुद्ध बाजूने सतत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. जाचक त्रास देण्याचा प्रयत्न  केंद्राच्या या एजन्सी करत आहेत. हे जगजाहीर आहे.

कोणाची चूक नुसताना बदनाम केलं जात आहे. हा विरोधकांना नामोहरम करण्याचा भाजपचा डाव आहे, असं सांगतानाच खडसे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्ष पूर्ण ताकदीने उभा असल्‍याचे पाटील यांनी सांगितले.

पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ओबीसी आरक्षणावर केलेल्या भाष्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली.

आमची भूमिका हीच की, महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था होण्याच्या आधी ओबीसींचा प्रश्न सुटला पाहिजे.

आमची बैठक झाली आहे.त्यामुळे वेगळी चर्चा करण्याची गरज नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

विधान परिषदेच्‍या १२ सदस्यांच्या नियुक्तीबाबत राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावा.

राज्यपाल लवकर निर्णय घेत नसल्याने लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवले जात असल्याचा आरोपदेखील त्यांनी या वेळी केला.

हेही वाचलं का ?

Back to top button