यवतमाळ : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा आवळून खून | पुढारी

यवतमाळ : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा आवळून खून

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्‍याची धक्‍कादायक घटना सोमवारी आर्णी तालुक्यातील सुकळी येथे उघडकीस आली. पोलिसांनी संशयीत आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. सविता विनोद कथलेवाड असे मृत पत्नीचे नाव असून, पती विनोद चंद्रभान कथलेवाड (वय ३३ रा. कवठा बाजार, ता.आर्णी) याला पाेलिसांनी ताब्‍यात घेतले आहे.

विनोद कथलेवाड हा पत्नी सविताच्या माहेरी सुकळी येथे वास्तव्याला होता. कथलेवाड दाम्‍पत्‍याला दाेन मुली आहेत. रविवारी सकाळी सविता वडील मोतीराम पिट्टलवाड यांच्या घरी गेल्‍या हाेत्‍या. रात्री विनोद व सविता यांच्यात जेवण करण्यावरून वाद झाला. यावेळी विनाेदने सविताचा गळा आवळून खून केला, अशी फिर्याद सविताचे वडील मोतीराम यांनी दिली आहे.  विनोदविरोधात गुन्हा नोंद केला आहे. एकीकडे आईचा मृत्यू आणि दुसरीकडे वडिलांना तुरुंगवास यामुळे दोन मुलींचे छत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त हाेत आहे.

हेही वाचा :

Back to top button