यवतमाळ : इजारा येथे डोहात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू | पुढारी

यवतमाळ : इजारा येथे डोहात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील इजारा येथील हातपाय धुण्यासाठी नदीवर गेलेल्या विद्यार्थ्याचा डोहात बुडून मृत्यू झाला. ओम प्रल्हाद चव्हाण ( वय १६, रा. यावली) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, ओम हा रविवारी आपल्या मित्रांसोबत शेतात खत टाकण्यासाठी गेला होता. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शेतातून घराकडे परतत असताना तो नदीवर हातपाय धुण्यासाठी गेला. यावेळी पाय घसरल्याने ओम हा खोल डोहात पडला. तो नदीच्या डोहात बुडत असल्याने सोबतच्या मित्रांनी मदतीसाठी आजूबाजूच्या नागरिकांना बोलवले. त्यावेळी काही लोक मदतीला धावून आले. तोपर्यत ओम डोहात बुडाला होता.

यानंतर घटनेची माहिती यवतमाळ तहसीलदार व वडगाव जंगल पोलिसांना देण्यात आली. आपत्कालीन शोध व बचाव पथकातील किशोर भगत, प्रदीप चव्हाण, धीरज गावंडे, श्रीकांत कासार, सुमित सोनोने, नीरज पातुरकर, अविनाश ढोले, सुभान अली, गिरज मुसळे, संदीप उरकुडे यांनी शोधमोहीम सुरू केली. रविवारी रात्री उशिरापर्यंत ओमचा शोध लागला नाही. सोमवारी (दि.१) रोजी डोहात त्याचा मृतदेह आढळला.

नगर : केडगावात तरुणास बेदम मारहाण

ओमने दहावीची परीक्षा उत्तीर्ण करून अकरावीत प्रवेश घेतला होता. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार पवन राठोड यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर दरणे, जमादार भाऊराव बोकडे, दादाराव गेडाम, गजानन डोंगरे, नीलकमल भोसले, विश्वास थूल करीत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button