यवतमाळ : सुनेच्या छळाला कंटाळून सासर्याची आत्महत्या
यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : सुनेच्या छळाला कंटाळून सासर्याची आत्महत्या : सुनेकडून वारंवार होणारा अपमान सहन न झाल्याने सासर्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. अवधूतवाडी पोलिस ठाण्याअंतर्गत लोहारा येथे ही घटना गुरुवारी उघडकीस आली.
साहेबराव दवणे (वय ६५) रा. पंचशीलनगर लोहारा असे मृतकाचे नाव आहे. ते येथील एमआयडीसीमध्ये चौकीदार म्हणून काम करीत होते. त्यांनी चार बचत गटाचे कर्ज उचलून मुलगा सूरज याचा विवाह करुन दिला होता.
- चिमुकल्याचा नरबळी : “माणसं आजही मध्ययुगातील विचारानेच वावरताहेत”
- राज ठाकरे : ‘मी बाबासाहेबांकडे एक इतिहासकार म्हणून जातो, ब्राह्मण म्हणून जात नाही’
सुनेच्या छळाला कंटाळून सासर्याची आत्महत्या
नवीन सून घरात आली. तिने सासू-सासर्यांची सेवा करण्याऐवजी क्षुल्लक कारणावरुन वाद घालने सुरू केले. लग्नासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करू नये असा दबाव तिने पतीवर आणला होता.
सासर्याला अश्लील शिवीगाळ करून तुम्हाला जेलमध्ये टाकतो अशी धमकीही तिने दिली होती. मानसिक धक्का बसल्याने साहेबराव दवणे यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून गळफास लावून घेतला.
- सरकारी नोकरीतील दिव्यांगांसाठीचे ४% आरक्षण रद्द; मोदी सरकारचा निर्णय
- कागल नरबळी : अपत्य प्राप्तीसाठी डॉक्टर मित्राच्या मुलाचा गळा चिरून नरबळी!
सासर्याच्या मृत्यूला कारणीभूत असल्याने पोलिसांनी सुनेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संध्या सुरज दवणे (वय २२) असे सुनेचे नाव आहे. पुढील तपास अवधूतवाडी पोलिस करीत आहे.
हे ही वाचलं का?
- हातामध्ये गंडा, कंडा घालत नाही : उपमुख्यमंत्री पवार
- नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद आहे तरी काय?
- शिवा सिद्धी दिसणार पुन्हा एकत्र ? शाही पेहरावातील लूक झाला व्हायरल