गडचिरोलीत दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, १२ लाखांचे होते बक्षीस | पुढारी

गडचिरोलीत दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, १२ लाखांचे होते बक्षीस

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवांद्याचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून अखेर १२ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांनी गुरूवारी (दि.12) गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. कोलु ऊर्फ विकास ऊर्फ सुकांत विनोद पदा (वय २७) व राजे ऊर्फ डेबो जैराम उसेंडी (वय ३०) अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांची नावे आहेत.

कोलू पदा हा छत्तीसगढ राज्यातील वक्र येथील, तर राजे उसेंडी ही गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जवेली येथील रहिवासी आहे. दोघांवरही खून, चकमक आणि दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. शासनाने कोलू पदावर आठ लाख तर राजे उसेंडी हिच्यावर चार लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, अशी माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.

2019 ते 2022 या कालावधीतआतापर्यंत एकुण 47 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा असे आवाहन गडचिरोली पोलीस अधीक्षक गोयल यांनी केले आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button