Anushka Sharma : विराट कोहलीच्या टीकाकारांवर पत्नी अनुष्का शर्माचा पलटवार, म्हणाली... | पुढारी

Anushka Sharma : विराट कोहलीच्या टीकाकारांवर पत्नी अनुष्का शर्माचा पलटवार, म्हणाली...

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनुष्का शर्माने (anushka sharma) अलीकडेच विराट कोहलीची (Virat Kohli) आरसीबी (RCB) इनसाइडरसोबतची मुलाखत तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. कोहलीचा सर्व फॉरमॅटमध्ये खराब फॉर्म बर्याच काळापासून सुरू आहे आणि क्रिकेट तज्ज्ञांसह अनेक खेळाडूंनी विराटच्या खराब फॉर्मबद्दल टीका केली आहे. दोन वर्षांहून अधिक काळ, विराटच्या बॅटमधून शतक आलेले नाही आणि आयपीएलच्या चालू हंगामात त्याला 12 सामन्यांत केवळ 216 धावा करता आल्या आहेत.

त्याच मुलाखतीत विराटने मनापासून सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आणि काही परिस्थितींमध्ये जेव्हा त्याचा फॉर्म चांगला नसतो तेव्हा त्याला असहाय्य कसे वाटते हे देखील सांगितले. या आयपीएल सीझनमध्ये कोहलीला तीन गोल्डन डक मिळाले आहेत आणि त्याच्या स्टँडर्डचा विचार केला तर ही बाब अजिबात चांगली नाही. ही मुलाखत पाहिल्यानंतर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मानेही (anushka sharma) तिची प्रतिक्रिया दिली आहे.

Anushka Sharma’s IG story.

कोहलीच्या मुलाखतीचा स्क्रीनशॉट शेअर करत अनुष्काने (anushka sharma) तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, ‘जर तुम्ही स्वतःवर हसू शकत नसाल तर तुम्ही शतकातील सर्वात मोठा विनोद मिस कराताय.’

अनुष्का शर्माने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये काय म्हटलंय… (anushka sharma)

त्या मुलाखतीबद्दल बोलताना कोहलीने आयपीएलमध्ये गोल्डन डक मिळवण्याबद्दलच्या त्याच्या खऱ्या भावना प्रकट केल्या आणि त्याच्या कारकिर्दीत असे कधीही घडले नाही असे त्याने सांगितले. टीकाकारांना त्याच्या आयुष्याविषयी काहीच माहिती नसते, त्यामुळे तो त्याकडे दुर्लक्ष करतो आणि या सर्व गोष्टींपासून दूर राहतो.

त्या मुलाखतीत कोहली म्हणाला की, आयपीएलमध्ये गोल्डन डक मिळवण्याबद्दलच्या माझ्या ख-या भावना व्यक्त करतो. माझ्या कारकिर्दीत असे कधीच घडलेले नाही, हे मी प्रामाणिकपणे कबुल करतो. पण टीकाकारांना माझ्या आयुष्याविषयी काहीच माहिती नसते, त्यामुळे मी त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करतो आणि या सर्व गोष्टींपासून दूर राहतो, असा टोला कोहलीने लगावला.

मुलाखतीत विराट म्हणाला, ‘दोन गोल्डन डकनंतर मला पूर्णपणे असहाय्य वाटले. माझ्या कारकिर्दीत माझ्यासोबत असे कधीच घडले नव्हते, कदाचित त्यामुळेच माझ्या चेहऱ्यावर हसू उमटले असेल.’

विराट कोहलीला त्याचा खराब फॉर्म आणि तो टीकेपासून कसा दूर राहतो याबद्दल विचारले असता तो म्हणाला, ‘ते माझी भावना समजू शकत नाहीत. त्यांना जाची जाणीव होत नाही त्याची जाणीव मला होते.’

Back to top button