'न्यायालयाकडून बसणाऱ्या फटक्यांमुळे उद्धव ठाकरेंच्या दोन्ही गालावर सूज आली आहे' | पुढारी

'न्यायालयाकडून बसणाऱ्या फटक्यांमुळे उद्धव ठाकरेंच्या दोन्ही गालावर सूज आली आहे'

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रशासनाचा माफियासारखा वापर केला जात असून या नेत्यांना आम्ही धडा शिकवू, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी (दि.१२)  दिला. आमदार आणि खासदाराला २० फूट खोल गाडण्याची धमकी दिली जात आहे त्यामुळे याची माहिती केंद्रीय गृहराज्यसचिवांना भेटून दिली आहे असेही त्यांनी यावेळी नमुद केले.

Rajya Sabha Polls : राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जून रोजी मतदान!

उद्धव ठाकरे यांच्या माफिया सरकारचा शेवट करूनच आम्ही शांत बसू असा इशारा देखील त्यांनी दिला. दरम्यान, सोमय्या यांनी राणा दाम्पत्याची भेट घेऊन त्यांच्या सोबत चर्चा केली.

जालन्यात शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यावरुन दोन गटांत दगडफेक

‘उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाकडून सतत बसणाऱ्या फटक्यांमुळे उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही गालांवर सूज आली आहे,’ अशा शब्दांत सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे पारदर्शकपणे काम करत नसल्याचा आरोप पुन्हा एकदा त्यांनी केला.

छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासाचे कार्य सुरू रहावे : शरद पवार

‘मुंबईचे माफिया पोलीस आयुक्त कुठे आहेत? ते राणा दाम्पत्याला स्पष्टीकरण मागत होते. आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयालाकडून स्पष्टीकरण मागावे, कारण त्यांच्या राजद्रोहाच्या कलमावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणली आहे. पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या माफियागिरीचाही आम्ही अंत करू असेही सोमय्या म्हणाले.

हे वाचलंत का?

Back to top button