बीड : गेवराई तालुक्यातील पाचेगावमधील महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या | पुढारी

बीड : गेवराई तालुक्यातील पाचेगावमधील महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

गेवराई; पुढारी वृत्तसेवा: गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील एका २५ वर्षीय महिलेने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव हिना सुरेश राठोड (वय २५) असे आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, पाचेगाव येथे आज गुरुवारी (दि.१२) रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सदरील महिलेस विहिरीकडे धावत जात असताना तिच्या सासूने बघितले आणि तिला पाठीमागून जोराने आवाज देत थांबवण्याचे प्रयत्न केले. परंतु, हिनाने पळत जाऊन विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.

सदरील घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी विहिरीकडे धाव घेत हिनाला वाचवण्याचे खूप प्रयत्न केले. पण विहीर खूप खोल असल्यामुळे त्यांना यश आले नाही. सदरील महिला हिनाला दोन अपत्ये आहेत. अद्यापही आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

हेही वाचलंत का?

Back to top button