Ruturaj Gaikwad : गायकवाड असेल CSK चा पुढचा कर्णधार! माजी क्रिकेटरचे भाकीत

Ruturaj Gaikwad : गायकवाड असेल CSK चा पुढचा कर्णधार! माजी क्रिकेटरचे भाकीत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) कर्णधारपदावर माजी दिग्गज क्रिकेटपटू अजय जडेजाने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर सीएसकेचा संघ ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) संघाचा कर्णधार बनवू शकतो, असे त्याने भाकीत केले आहे.

खरं तर, आयपीएल 2022 सुरू होण्यापूर्वी अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधार पदाची सूत्रे बहाल करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर संघाने निराशाजनक कामगिरी केली. सलग सहा सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. रविंद्र जडेजाच्या स्वत:च्या कामगिरीवरही बराच परिणाम झाला. याच कारणामुळे त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि पुन्हा एकदा एमएस धोनीकडे संघाचे नेतृत्व बहाल करण्यात आले. (Ruturaj Gaikwad)

सीएसके ऋतुराज गायकवाडलाही आजमावू शकते – अजय जडेजा

माजी क्रिकेटर अजय जडेजाच्या मते, चेन्नईकडे आता गमावण्यासारखे काही नाही. अशा परिस्थितीत ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) कर्णधार बनवून चाचपणी घेतली पाहिजे. क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपले मत व्यक्त केले.

अजय जडेजा म्हणाला की, सीएसकेने रवींद्र जडेजाला कर्णधार बनवले कारण त्याच्यामध्ये त्यांना भविष्य दिसत होते. पण स्टार अष्टपैलू जडेजा ही जबाबदारी पेलवली नाही, आणि तो नेतृत्व करण्यात अपयशी ठरला. आता सीएसकेची नजर ऋतुराज गायकवाडकडे असेल. अधिकृतपणे प्लेऑफमधून बाहेर पडल्यानंतर सीएसके ऋतुराजकडे कर्णधारपद देऊ शकते. पण ही नवी जबाबदारी तो कसा पार पाडेल हे पाहण्यासारखे आहे. आता हे भाकीत कितपत खरे ठरेल येणारा काळच ठरवेल.

दरम्यान, रवींद्र जडेजा आयपीएल 2022 च्या उर्वरित सामन्यांमधून दुखापतीच्या कारणांमुळे बाहेर पडला आहे. याबद्दल आधीच अटकळ बांधली जात होती पण आता त्याला अधिकृत दुजोरा मिळाला आहे. चेन्नई सुपर किंग्जनेही एक ट्विट केले आहे. जडेजा दुखापतीमुळे उर्वरित आयपीएलमधून बाहेर पडेल, असे त्यात म्हटले आहे. आम्ही आमच्या जादूगाराला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो, अशी भावनाही व्यक्त करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news