मनपा निवडणुकीच्‍या तोंडावर आमदार गणेश नाईक यांच्‍या अडचणीत वाढ, बलात्‍काराचा गुन्‍हा दाखल

मनपा निवडणुकीच्‍या तोंडावर आमदार गणेश नाईक यांच्‍या अडचणीत वाढ, बलात्‍काराचा गुन्‍हा दाखल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्‍या तोंडावर भाजपचे नेते आणि आमदार गणेश नाईक यांच्‍या अडचणीत वाढ झाली आहे. रिव्हॉल्व्हर दाखवून ठार मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला हाेता. याप्रकरणी राज्य महिला आयोगाकडे संबंधित महिलेने तक्रार दिली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे पत्र महिला आयोगाने नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना दिले. त्यानंतर नाईक यांच्यावर बलात्‍काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका पीडित महिलेला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात २४ तास आधी गुन्हा नोंदविलेला या गुन्ह्याला २४ तास उलटत नाही. तोच बलात्काराचा आणखी एक गुन्हा आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

सुरुवातीला पीडित महिलेने दोन आठवडे आधी नेरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लागोपाठ दोन गुन्हे दाखल झाल्यामुळे नाईक यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. तीन दिवसांपूर्वी विधान परिषद उपसभापती नीलम गो-हे यांनी थेट गणेश नाईक यांनी स्वत:हून डीएनए टेस्ट करावी. असे म्हटले होते. याबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्तांना एक पत्र पाठवून या प्रकरणी कार्यवाही करण्याची सूचना केली होती. मात्र, महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याने नेरूळ पोलिसांना पीडित महिलेचे जबाब नोंदवून १६ एप्रिलरोजी रात्री बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

गेल्या २७ वर्षांपासून लिव्ह अ‍ॅण्ड रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका महिलेने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नाईक यांच्यापासून आपल्याला एक मुलगा झाला असून तो आता पंधरा वर्षांचा आहे. हा मुलगा पाच वर्षांचा झाल्यानंतर मुलाचा आणि त्याच्या आईचा आपण अधिकृतपणे स्वीकार करू, अशी ग्वाही नाईक यांनी या महिलेला दिली होती. मात्र, नाईक यांनी आपला शब्द फिरवून या महिलेची फसवणूक केली. नाईकांकडून फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पीडित महिलेने शरीरसंबंध ठेवण्यास नाईक यांना विरोध केला. मात्र नाईकांनी जबरदस्ती करून आपल्यावर वारंवार अत्याचार केला, अशी तक्रार पीडित महिलेने नेरुळ पोलीस ठाण्यात केल्यानंतर पोलिसांनी नाईक यांच्या विरोधात शनिवारी रात्री बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

दरम्यान, रिव्हॉल्व्हर रोखून ठार मारण्याची धमकी पीडित महिला आपला हक्क मागणी करू लागल्यानंतर नाईकांकडून तिला धमकाविणे सुरू झाले. गणेश नाईक यांनी आपल्या बेलापूर येथील सेक्टर १५ मधील कार्यालयात या महिलेवर रिव्हॉल्व्हर रोखून तिला ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी सीबीडी पोलिसांनी गणेश नाईक यांच्या विरोधात दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केला आहे. त्या पाठोपाठ आता नेरूळ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. यामुळे नाईक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याने नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचलंत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news