दिल्‍लीतील जहांगीरपुरी हिंसाचारप्रकरणी गोळीबार करणार्‍यासह १४ जणांना अटक

४२ लाखांची फसवणूक
४२ लाखांची फसवणूक

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
दिल्‍लीतील जहांगीरपुरी हिंसाचारप्रकरणी १४ जणांना अटक करण्‍यात आली आहे. हिंसाचारावेळी गोळीबार करणारा अस्‍लम याचाही यामध्‍ये समावेश आहे. या प्रकरणाच्‍या चौकशीसाठी दिल्‍ली पोलिसांनी १० टीम स्‍थापन केल्‍या आहेत.

दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये हनुमान जयंतीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीवेळी हिंसाचार झाला. या वेळी मोठ्या प्रमाणाच दगडफेक करण्यात आली, तसेच काही जणांकडून तलवारीदेखील नाचवत दहशत माजविण्यात आली. मिरणुकीतील शोभा यात्रेत दगडफेक झाल्यानंतर ही हिंसात्मक घटना जास्त चिघळली. उपनिरीक्षक मेदालाल हे गोळीबारात जखमी झाले आहे.

जहांगीरपुरी पोलिस ठाण्‍यात महेंद्र पार्क व पीएस आदर्श नगर येथेील शांतता समितीमधील सदस्‍यांनी बैठकीचे आयोजन करण्‍यात आले. यावेळी परिसरात शांतता कायम ठेवण्‍यासाठी प्रयत्‍न करावेत, असे आवाहन करण्‍यात आले. तसेच हिंसाचार प्रकरणातील दोषींवर योग्‍य कायदेशीर कारवाई करण्‍यात यावी, अशी मागणी करण्‍यात आली.

परिस्‍थिती नियंत्रणात

पोलिसांनी हिंसाचारावेळी गोळीबार करणार्‍या २० वर्षीय तरुण मोहम्‍मद अस्‍लम अशी आहे. तो सीडी पार्क झोपडपट्‍टीत राहतो. त्‍याच्‍याकडून गोळीबारासाठी वापरलेले पिस्‍तुल जप्‍त करण्‍यात आले आहे. तसेच गोळीबार करणार्‍या अस्‍लमसह १४ जणांना अटक करण्‍यात आले आहे. परिसरात कायदा व सुव्‍यवस्‍थेची परिस्‍थिती नियंत्रणात असल्‍याचे विशेष पोलीस आयुक्‍त दीपेंद्र पाठक यांनी सांगितले. तसेच अफवांवर लक्ष देवू नये, असे आवाहनही त्‍यांनी केले ओ.

दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये दोन समुदायामध्ये मोठी दंगल झाली. हनुमान जन्मोत्सन दरम्यान काढण्यात आलेल्या शोभा यात्रेत दगडफेक करण्यात आली. यामध्ये पोलीस कर्मचारीही जखमी झाले होते. दिल्ली पोलीस पीआरओ डीसीपी अन्वेयस राय म्हणाले की, "जहांगीरपुरीमध्ये शोभा यात्रेदरम्यान हिंसा झाली " या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दगडफेक आणि आगीच्या घटनेमध्ये हेल्मेट घातलेले पोलीस कर्मचारी हिंसात्मक घटनेवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत आहेत. या हिंसेमध्ये तरुण मोठ्या प्रमाणात जखमी झालेले व्हायरल झालेल्या व्हिडिओंमधून दिसून येत आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news