पुणे : देवीच्या दर्शनासाठी जीव मुठीत घेऊन भक्‍तांचा होडीतून प्रवास | पुढारी

पुणे : देवीच्या दर्शनासाठी जीव मुठीत घेऊन भक्‍तांचा होडीतून प्रवास

मांडवगण फराटा (जि.पुणे), पुढारी वृत्तसेवा : वडगाव रासाई (ता. शिरूर) ते नानगाव (ता. दौंड) या दोन गावचे रासाई देवी हे ग्रामदैवत आहे. हे दैवत भीमा नदी पात्रात असून देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून अनेक भाविक दर्शनसाठी येत असतात. परंतु सध्या नदी पात्र तुडूंब भरले असल्याने भाविकांना होडीतून प्रवास करावा लागत आहे. भाविक आपल्‍या जीवाची पर्वा न करता जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत.

दरम्‍यान, वडगाव रासाई येथे गावात एक मंदिर भीमा नदी पात्रात व नानगाव (ता. दौंड) येथे तीन मंदिरे आहेत. दोन्ही गावच्या यात्रा उत्सव साजरा केला जातो. परंतु भीमा नदीला बारमाही पाणी असल्याने नदी पात्रात दर्शनाला जाण्यासाठी पुलाची व्यवस्था नाही. त्यामुळे भाविकांना होडीतून प्रवास करावा लागतो. या होडीत प्रचंड गर्दीमूळे नावड्यांना होडी चालवताना मोठी कसरत करावी लागते आहे. एका होडीत जवळपास एकावेळी ३० ते ३५ भाविक प्रवास करत असतात. या ठिकाणी मंदिरात जाण्यासाठी झुलता पुल व्हावा, अशी मागणी भाविकांमधून केली जात आहे.

हेही वाचा 

Back to top button