ट्विटर आपल्या यूजर्ससाठी आणतंय ‘हे’ खास फीचर | पुढारी

ट्विटर आपल्या यूजर्ससाठी आणतंय 'हे' खास फीचर

पुढारी ऑनलाईन डेस्क : मायक्रो ब्लॉगिंग सोशल नेटवर्कींग साइट म्हणून ओळखले जाणारे ट्विटर संपादन बटणावर (Edit button) काम करत आहे, ज्याद्वारे एखाद्याने ट्विट केल्यानंतर त्याला पुन्हा त्याचे ट्विट संपादित करण्याचा पर्याय दिला जाणार आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी नुकतीच ट्विटरमध्ये 9.2 टक्के निष्क्रिय भागीदारी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी एका सर्वेक्षणात त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर फॉलोअर्सना विचारले की, त्यांना ट्विटरमध्ये एडिट फीचर हवे आहे का ? यावर यूजर्सच्या सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. संपादन बटण (Edit button) कसे अंमलात आणायचे याबद्दल कंपनीला जरी चिंता आहे. तरी, येत्या काही महिन्यांत एडिट बटणाची चाचणी सुरू करणार असल्याची माहिती ट्विटरने दिली आहे.

Image

या एडिट बटणाची चाचणी सर्वप्रथम वेरिफाइड ब्लू ट्विटर अकाउंटवर (Verified Account) करण्यात येणार आहे. या नवीन एडिट बटनामुळे यूजर्स कोणतेही प्रत्युत्तर, रिट्विट्स किंवा लाईक्स न गमावता ट्विटमधील चुका सुधारण्यास मदत होणार आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button