एलआयसीमधील २० टक्क्यांपर्यंतच्या एफडीआयसाठी ‘फेमा’ कायद्यात सुधारणा | पुढारी

एलआयसीमधील २० टक्क्यांपर्यंतच्या एफडीआयसाठी 'फेमा' कायद्यात सुधारणा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी एलआयसीमधील २० टक्क्यांपर्यंतच्या थेट विदेशी गुंतवणुकीसाठी (एफडीआय) केंद्र सरकारने फॉरेन एक्सेंज मॅनेजमेंट ॲक्ट अर्थात फेमा कायद्याच्या नियमावलीत सुधारणा केली आहे. विशेष म्हणजे येत्या काही काळात एलआयसीकडून समभागांचीही विक्री केली जाणार आहे.

आयपीओच्या माध्यमातून एलआयसी पैसा जमविणार असून, त्यासाठी गेल्या फेब्रुवारी महिन्यात कंपनीकडून भांडवली बाजाराचे नियंत्रण करणाऱ्या सेबीकडे डीआरएचपी दाखल करण्यात आले होते. त्याला सेबीकडून मंजुरी देण्यात आली होती. सार्वजनिक विमा कंपनीतील थेट विदेशी गुंतवणुकीसाठी फेमा कायद्याच्या नियमात बदल करणे गरजेचे ठरले होते. त्यानुसार नुकतेच हे बदल करण्यात आले आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button