डोंबिवली : घरगुती गॅस सिलिंडरच्‍या स्फोटात ज्येष्ठ नागरिक जखमी

डोंबिवली : घरगुती गॅस सिलिंडरच्‍या स्फोटात ज्येष्ठ नागरिक जखमी

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा :डोंबिवली पश्चिम येथील उमेशनगर परिसरात घरगुती गॅस सिलिंडरच्‍या  ज्येष्ठ नागरिक जखमी झाले. ही दुर्घटना आज (दि.१७) पहाटे घडली.

डोंबिवली पश्चिम येथील उमेशनगर परिसरात राहणारे हनुमंत मोरे (६५) हे घरात एकटे राहतात. सकाळी घरातील सिलिंडरमधून वास येत असल्याने ते बघण्यासाठी गेले. तपासणी करत असताना त्‍यांनी गॅस पेटविण्याचा प्रयत्न केला. स सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये हनुमंत मोरे ३३, टक्के भाजले आहेत.

स्फोट झाल्यानंतर आजूबाजूच्या नागरिक घराबाहेर आले. अग्निशमन विभागाला या घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मोरे यांच्‍यावर डोंबिवली येथील रुग्णालयात पचार करण्‍यात आले. त्यांचा मुलाने त्‍यांना अंधेरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मुलगा श्रीनिवास मोरे यांनी दिली.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news