

भोर : पुढारी वृत्तसेवा: वेळवंड खोर्यातील (ता. भोर) पसुर्यात अतिवृष्टीमुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अंदाजे 30 हेक्टर भात शेतीचे नुकसान झाले असून, प्रत्येक शेतकर्यांचे लाखो रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे. वेळवंड भागात एकमेव भातपीक असून शेतकर्यांचे वर्ष भातशेतीतून मिळणार्या उत्पन्नावरच अवलंबून असते. मात्र, यंदा अतिवृष्टीचा फटका भातशेतीला बसून शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शेतकर्यांनी नुकसानीच्या पंचनाम्याची मागणी केली होती.
मागणीनुसार शनिवार (दि.16) पासून प्रशासनाने भातपिकाचे तसेच घरांचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. तलाठी अमोल सूर्यवंशी, कृषी सहायक रोहिदास चव्हाण यांनी हे पंचनामे करत आहेत. सुरेश धुमाळ, दीपक धुमाळ, तानाजी धुमाळ, गोपीनाथ धुमाळ, प्रणव बांदल आदी शेतकरी उपस्थित होते.
शेतीचे व घराचे पंचनामे केले आहेत. मात्र, शासनाने लवकरात लवकर नुकसानभरपाई शेतकर्यांच्या खात्यावर जमा केली तरच शेतकर्यांना दिलासा मिळेल.
– मनोज धुमाळ, सामाजिक कार्यकर्ते.