

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले प्रकल्प गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेल्याने शिंदे-फडवणीस सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांकडून केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच गुजरात सरकारचा निषेध म्हणून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला असता ठाणे नगर पोलिसांनी हा पुतळा जप्त केला.
या आंदोलनात मोहसीन शेख, प्रफुल कांबळे, गजानन चौधरी, अभिषेक पुसालकर, संतोष मोरे, श्रीकांत भोईर, संदीप येताल, आकाश पगारे, सिदिक शेख, जितेश पाटील, संकेत पाटील, सुनील निषाद, अमित लगड, अमित खरात, अमोल यखे, सोनू सकपाळ, फिरोज पठाण, दिनेश सोनकांबळे, महेश सिंह, भावेश धोत्रे, महेश यादव, साई भोगवे, दौलत समुखे, भारत पवार, विषांत गायकवाड आदी सहभागी झाले होते.
हेही वाचा :