कल्याणच्या तहसीलदारासह शिपायास एक लाख, वीस हजारांची लाच घेताना पकडले | पुढारी

कल्याणच्या तहसीलदारासह शिपायास एक लाख, वीस हजारांची लाच घेताना पकडले

कल्याण पुढारी वृत्तसेवा : जमिनीबाबतच्या हरकती वरील सुनावणीचे निकालपत्र देण्यासाठी एक लाख वीस हजार रुपयांची लाच घेताना कल्याण तहसीलदार व त्यांचा सहकारी शिपाई या दोघांना लाचालुचत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.  तहसीलदार दिपक आकडे व शिपाई बाबु उर्फ मनोहर हरड अशी अटक केल्यांची नावे आहेत.

कल्याण तालुक्यातील मौजे वरप येथील एका बांधकाम कंपनीच्या जमिनीबाबतचे हरकतीवरील सुनावणीचे निकालपत्र देण्यासाठी पडताळणी दरम्यान तहसीलदार दीपक आकडे यांनी स्वत: करिता एक लाख रुपये लाचेची मागणी करुन ती कार्यालयीन शिपाई बाबू उर्फ मनोहर हरड याचेकडे देण्यासाठी सांगितली.

तहसीलदार यांचा शिपाई मनोहर हरड यांनी स्वत: करिता व स्टाफ करिता वीस हजार रुपये, अशी एकूण एक लाख वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तकार तक्रारदाराने लाचलुचपत विभाग ठाणे यांच्याकडे केली होती. यानूसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सोमवारी सकाळी कल्याण तहसीलदार कार्यालयात सापळा रचला. तहसीलदार यांच्या शिपाईला तहसीलदार यांच्या करीता एक लाख व स्वत: साठी वीस हजार असे एक लाख वीस हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभाग ठाणे पथकाने रंगेहाथ पकडले.

कल्याण तहसीलदार दिपक आकडे व शिपाई बाबु उर्फ मनोहर हरड यांना अटक केली आहे. सदरची कारवाई लाचलुचपत विभाग ठाणे परिक्षेत्राचे अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक निलिमा कुलकर्णी, यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभाग ठाण्याचे पो.नि.संतोष शेवाळे, पो.ना.प्रशांत घोलप, म.पो.ना. जयश्री पवार, पो.शि.विनोद जाधव , पो.शि.पद्माकर पारधी, चा.पो.हवा.महाले आदी पथकाने केली.

हेही वाचलं का ?

पूरग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी काढलेल्या पदयात्रेबाबत राजू शेट्टी यांची पत्रकार परिषद

Back to top button