विनोद कुमार यांनी मिळवलेले कांस्य पदक का गमावले? | पुढारी

विनोद कुमार यांनी मिळवलेले कांस्य पदक का गमावले?

टोकियो : पुढारी ऑनलाईन

टोकियो पॅरा ऑलिम्पिकमध्ये थाळी फेक ( एफ ५२ ) प्रकारात विनोद कुमार यांनी कांस्य पदक पटकावले होते. पण, स्पर्धा आयोजक समितीने तांत्रिक कारणासाठी हा निकाल राखून ठेवला होता. हा निकाल आज आयोजक समितीने दिला असून दुर्दैवाने विनोद कुमार यांनी कांस्य पदक गमावले.

विनोद कुमारांना अपंगवत्वाच्या श्रेणीत न बसल्याने आपले पदक गमवावे लागले आहे. २९ ऑगस्टला टोकियो पॅरा ऑलिम्पिकमध्ये एकूण तीन पदके जिंकली होती. ही पॅरा ऑलिम्पिकमधील भारताची ऐतिहासिक कामगिरी होती. यातील तिसरे पदक विनोद कुमारांनी जिंकले होते.

विनोद कुमार यांनी आपल्या पहिल्या प्रयत्नात १७.४६ मीटर, दुसऱ्या प्रयत्नात १८.३२ मीटर, तिसऱ्या प्रयत्नात १७.८० मीटर, चौथ्या प्रयत्नात १९.२० मीटर, पाचव्या प्रयत्नात १९.९१ मीटर ( आशियाई रेकॉर्ड ) आणि सहाव्या प्रयत्नात १९.८१ मीटर थाळी फेकली होती. या प्रकारात पोलंडच्या पिओत्र कोसेव्कि याने सुवर्ण पदक जिंकले होते.

विनोद कुमारांनी एफ – ५२ थाळीफेक प्रकारात कांस्य पदक जिंकले होते. त्यांनी फक्त कांस्य पदक जिंकले नाही तर एक नवे आशियाई रेकॉर्ड प्रस्थापित केले. विनोद यांनी १९.९१ मीटर लांब थाळी फेकली होती. मात्र हा निकाल तांत्रिक कारणासाठी राखून ठेवण्यात आला. त्यानंतर आयोजकांनी अहवालात विनोद कुमार हे एफ – ५२ थाळीफेक प्रकारासाठी असलेल्या अपंगत्व श्रेणीत बसत नसल्याचे सांगितले.

हेही वाचले का? 

Back to top button