व्हिडिओ रेकॉर्ड करून महिलेने आत्महत्या करत मैत्रिणींना पाठवला संदेश

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : ठाण्यातील लोकमान्य नगरात आत्महत्येची घटना उघडकीस आली. सासरच्या जाचाला कंटाळून व्हिडिओ रेकॉर्ड करून महिलेने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली.
प्रिती शिवकुमार जैयस्वाल (35) असे मयत विवाहितेचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी पीडित महिलेने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती देणारा व्हिडिओ रेकॉर्ड करुन मैत्रिणींना पाठविला. व्हिडिओ रेकॉर्ड करून महिलेने आत्महत्या केली हे समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
- प्रधानमंत्री किसान सन्मान योजना निधी दुप्पट, वर्षाला ६ ऐवजी १२ हजार मिळणार
- नारायण राणेंचा इशारा, मी अजून राष्ट्रवादीकडे वळलेलो नाही, अजित पवार अज्ञानी
पतीने तिच्या आजाराकडेही कसे दुर्लक्ष केले, याचाही उल्लेख तिने यात केला आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चौकशी करण्यात येत असून दोषी विरोधात योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती वर्तकनगर पोलिसांनी सांगितले.
- शौमिका महाडिकांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर, उदगाव चिलींग सेंटरला भेट
- राणा जगजितसिंह पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र : मराठा आरक्षण देण्याची इच्छाशक्तीच नाही!
प्रितीच्या आजाराकडे दुर्लक्ष करतांना डॉक्टरांकडे न नेता तिचा पती मेलीस तरी चालेल, असे निर्दयीपणे म्हटल्याचेही तिने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
सासरचे आपल्याला खर्चासाठी एक छदामही देत नाहीत. त्यामुळे आपण पैसे जोडून शिलाई मशीन घेतली.
- नारायण राणेंचा इशारा, मी अजून राष्ट्रवादीकडे वळलेलो नाही, अजित पवार अज्ञानी
- कोरोना ची तिसरी लाट : आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर बंदी
तर तिचाही वापर करण्यास मज्जाव करण्यात आला. आपण उचलत असलेल्या या टोकाच्या पावलाबद्दल स्वत:च्या आई वडिलांची माफीही या संदेशात तिले मागितली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वर्तकनगर पोलिसांनी घटनास्थळी सकाळी धाव घेतली. तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, गुरुवारी रात्री किंवा शुक्रवारी पहाटेच तिने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात आली.
याप्रकरणी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वर्तकनगर पोलीस करीत आहेत.