कोरोना ची तिसरी लाट : आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर बंदी

file photo
file photo
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन: कोरोना ची तिसरी लाट येण्याचा धोका असल्याने केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय खासगी व्यावसायिक खासगी विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे. ३० सप्टेंबर पर्यंत ही बंदी असणार आहे. केरळमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण आढळ्यानंतर आता सरकार सतर्क झाले आहे.

डीजीसीएनं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे व्यावसायिक खासगी विमान उड्डाणावर ३१ ऑगस्टपर्यंत बंदी घातली होती. त्यात एक महिन्याची वाढ केली आहे.

हे निर्बंध आंतरराष्ट्रीय कार्गो विमान उड्डाणांवर लागू नसतील. यासोबतच डीजीसीएकडून मंजुरी मिळाली असेल अशा विमान उड्डाणांना सूट देण्यात आली आहे.

कोरोना संसर्गाचा धोका वाढल्यानंतर केंद्र सरकारने २०२० च्या मार्चमध्ये केंद्र सरकारने देशात पहिला लॉकडाऊन लावला होता.

त्यानंतर देशातील रेल्वे, बस आणि विमान वाहतूक बंद केली होती. सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद केली होती.

मे महिन्यापासू विमान प्रवास पूर्ववत करण्यात आला होता. पण यात केवळ डोमॅस्टीक विमानसेवा सुरू करण्यात आली होती.

तर आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर अजूनही काही निर्बंध लागू आहेत.

१.५० लाख नवे रुग्ण

कोरोना ची तिसरी लाट येणार नाही असे सांगितले जात असताना, केरळमध्ये कोरोनाचा वेग सतत वाढत आहे. गेल्या 5 दिवसातच राज्यात सुमारे 1.50 लाख नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. केरळ व्यतिरिक्त महाराष्ट्र, मिझोराम, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्येही कोरोनाची प्रकरणे अधिक येत आहेत.

२४ तासांत ४५ हजार रुग्ण

गेल्या 24 तासांत देशात 45 हजार प्रकरणे नोंदवण्यात आली. यामध्ये केवळ केरळमध्ये 31 हजार 265 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली. दरम्यान, कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचा कालावधी केंद्राने 30 सप्टेंबरपर्यंत वाढवला आहे. केंद्राने राज्यांना सणासुदीच्या काळात अतिरिक्त दक्षता घेण्यास सांगितले आहे. गरज पडल्यास स्थानिक पातळीवरील निर्बंध लादण्याची लवचिकताही राज्यांना देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाची 4831 नवीन प्रकरणे

महाराष्ट्रात शनिवारी कोरोना विषाणूच्या संसर्गाची 4,831 नवीन प्रकरणे नोंदली गेली. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याच्या मते, नवीन प्रकरणांची नोंद झाल्यानंतर एकूण प्रकरणांची संख्या 64,52,273 झाली आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news