सिंधुदुर्ग,पुढारी ऑनलाईन: मी अजून राष्ट्रवादीकडे वळलेलो नाही, त्यामुळे अजित पवार यांनी गप्प बसावे, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार अजून अज्ञानी आहेत, त्यांनी स्वत:चे खाते सांभाळावे अशी टीका राणे यांनी केली.
कोकणातील जन आशीर्वाद यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. त्यानिमित्ताने नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
यावेळी नारायण राणे यांनी अजित पवार यांच्या टिकेचा समाचार घेतला. 'अजित पवार अजून अज्ञान आहेत.
आपल्या खात्याचं बघा. अजून मी राष्ट्रवादीकडे अद्याप वळलेलो नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.
'आपल्यावरील आरोप किंवा केसेस कशा काढायच्या हे अजित पवारांकडून शिकलं पाहिजे,' असेही ते म्हणाले.
'सूक्ष्म आणि लहानमध्ये काय निधी मिळणार आहे?. निधी द्यायचं बोललं तर गडकरी साहेबाचं मंत्रालय देऊ शकते.
गडकरी साहेबांनी यापूर्वी निधी दिला आहे. कामे पण चालली आहेत. या खात्याचं पूर्वी नाव अवजड खातं होते.
काही लोकं त्याला गंमतीने अवघड खातंही म्हणायचे. आता त्याच्या नावात काही बदल झाले आहेत.' अशी टीका अजित पवार यांनी केली होती.
तसेच 'आता करोनाचं संकट आल्याने सुक्ष्म आणि लघू खूप सारे उद्योग अडचणीत आले आहेत.
देशातील छोट्या उद्योगांसाठी एखादा निर्णय घेत येत असावा, असं वाटतं,' असा टोलाही पवारांनी लगावला होता.
नारायण राणे यांच्या अटकेमागे राष्ट्रवादीचा हात असल्याचा संशय भाजपला आहे. राणे यांनी जीभ सांभाळून बोलावे असा सल्लाही अजित पवार यांनी दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहखाते असल्याने पोलिसांना मोकळीक देण्यात त्यांचा मोठा हात असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात राणे विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होऊ शकतो.
हेही वाचा: