डोंबिवली : फी भरली नसल्याने विद्यार्थ्याला कोंडले शाळेत? तर पालकांचे आरोप फेटाळले | पुढारी

डोंबिवली : फी भरली नसल्याने विद्यार्थ्याला कोंडले शाळेत? तर पालकांचे आरोप फेटाळले

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली पूर्वेतील ग्रीन इंग्लिश स्कूल येथील विद्यार्थ्याने शाळेची शुल्क भरली नसल्याने त्याला चालू वर्गातून बाहेर काढले. आणि शेजारील वर्गात त्‍याला कोंडले, त्यामुळे त्याला चक्कर आली असा आरोप पालकांनी केला आहे. त्यांनतर पालकांनी मुलाला शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केली. तसेच शाळेच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान शाळा व्यवस्थापनाने सर्व आरोप फेटाळत असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आजदे गावात राहणारा चंदन गिरी हा विद्यार्थी डोंबिवली पूर्वेतील ग्रीन इंग्लिश स्कूलमध्ये इयत्‍ता दहावी मध्ये शिकत आहे. त्याच्या पालकांनी शाळेची फी भरली नाही. त्‍यामूळे मंगळवारी (दि.19) सकाळी शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी त्याला चालू वर्गातून बाहेर काढले. आणि तेथील शेजारील वर्गात बसवले. त्यामुळे त्याला चक्कर आली. यानंतर शाळेने त्याच्या पालकांना बोलावले.

मुलाने घडलेला सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. यावेळी घाबरलेल्या पालकांनी प्रथम मुलाला महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार केले. त्यानंतर शाळेच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. याबाबत मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की ,याबाबत पोलिस चौकशी सुरू असून योग्य तो तपास करून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

शाळेने सांगितले…

असा कोणताही प्रकार झाला नसून दोन वर्ष त्या विदार्थ्याच्या पालकांना फी साठी सांभाळून घेतले आहे. तर या विद्यार्थ्याला फी न भरल्याने आज बाजूच्या वर्गात फॅन लावून बसवण्यात आले. तसेच शाळा सुटताना मुलाला जिन्यात चक्कर आल्याने त्याला शाळेने साखरपाणी देऊन त्याच्या पालकांना बोलावून घेतले. मात्र शाळेने त्याला कोणत्याही बंद खोलीत कोंडून ठेवले नसल्याचे खंडन शाळेचे व्यवस्थापक मोहन गोखले यांनी केला आहे. तसेच दोन वर्ष विद्यार्थांना फी साठी सांभाळून घेतले आहे.

हेही वाचा  

Back to top button