अमरावती : भाजपने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाचली हनुमान चालिसा | पुढारी

अमरावती : भाजपने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाचली हनुमान चालिसा

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : अचलपूर येथील दंगलीनंतर पोलिसांनी पक्षपाती कारवाई केल्याचा आरोप भाजपने केला आहे. मंगळवारी (दि.19) जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजपने आंदोलन केले. पक्षपातीप करणा-या प्रशासनाला सदृबुद्धी मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हनुमान चालिसाचे पठन केले.

पूर्व नियोजीत कट

अचलपूर येथे प्राचीन परकोटच्या दुल्हागेट प्रदेशद्वारावर लावलेला झेंडा काढण्यासाठी जमावाने हिंसक कृत्य केले होते. परकोटाच्या दुल्ला प्रवेशद्वार हे कोणाच्या खासगी मालकीचे नाही. या परकोटावर अनेकदा विविध धर्माचे झेंडे लागले आहेत. मात्र, त्यावेळेस कोणी आक्षेप घेतला नाही. मात्र, हा झेंडा काढण्याचा पूर्व नियोजीत कट आहे असे भाजपाचे म्हणणे आहे. हिंसक जमावाने धुडघूस घातल्यानंतर पोलिसांनी पक्षपाती कारवाया सुरू केल्या आहेत. आणि घटनेशी संबंध नसलेल्या युवकांना पोलिसांनी अटक केली.

न्याय देण्याची केली मागणी

भाजपाचे अचलपूर-परतवाडा मंडळाचे अध्यक्ष अभय माथने हे पुणे येथे मुलीला सोडण्यासाठी पत्नीसह होते. आणि पोलिसांनी त्यांना पुणे येथे अटक केली आहे. हिंसक जमावाने दगडफेक केली, तणाव निर्माण झाला. त्यावेळी माथने हे अचलपूरात नव्हते. ते पुण्याला रवाना झाले होते, असे भाजपच्या नेत्‍यांचे म्हणणे आहे.

राजकीय आकसापोटी ही कारवाई झाली असून दोन हजार लोकांच्या जमावाने हैदोस घातला होता. त्यातील बोटावर मोजता येईल एवढ्याच लोकांना पोलीस ताब्यात घेतात आणि तणावाशी संबंध नसलेल्या तरुणांना अटक केली. त्‍यामूळे भाजपकडून या कारवाईचा निषेध करण्यात आला. यावेळी माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे, शहराध्यक्ष किरण पातूरकर, जिल्हाध्यक्ष निवेदीता चौधरी, जयंत डेहनकर, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, तूषार भारतीय, प्रवीण तायडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा  

Back to top button