सांगोला शहर, तालुक्यात पावसाची दमदार हजेरी | पुढारी

सांगोला शहर, तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

सांगोला : पुढारी वृत्तसेवा सांगोला तालुक्यात दुपारी चार वाजल्यापासून मृग नक्षत्राचा पावसास दमदार सुरुवात झाली असून या पावसाने सखल भागात पाणी साचले आहे. हवेत गारवा निर्माण झाला आहे. गेल्या पंधरा दिवसापासून सांगोला तालुक्यांमध्येप्रखर उन्हामुळे उष्णतेचे प्रमाण वाढले होते. या उष्णतेमुळेहवेत उष्णता वाढली होती खडक उन्हाळ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. रोहिणी नक्षत्राचा पाऊस एक ही न झाल्याने शेतकरी वर्ग पावसाची आतुरतेने वाट पाहत होता.

रोहिणी नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेले. पण मृग नक्षत्र दुपारी बारा वाजता निघाले व सायन काळी चारच्या दरम्यान सुसाट वारा व विजेच्या कडकडाटासह पावसात सुरुवात झाली. या पावसामुळे उन्हाळी हंगामातील ऊस मका कडवळ या पिकांना जीवदान मिळाले आहे. तर मृग नक्षत्राचा पाऊस पडल्याने खरीप हंगामाच्या पेरणीसाठी ही हा पाऊस पोषक असल्याने शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.

Back to top button