

कराड,पुढारी वृत्तसेवा: अतिवृष्टी व महापुराचे संकट दूर झाले असतानाच कराड तालुक्यात कृष्णा काठच्या गावांत मगर दिसू लागली आहे. शहरासह आटके परिसरात स्थानिकांना मगर दिसली आहे.
पुन्हा शहरासह दोन ठिकाणी मगर आढलल्याने खळबळ उडाली आहे.
कराड शहरातील वाखाण परिसरातील नितीन जगताप यांच्या शेतानजीक ती आढळली.
जगताप यांच्यासह शशिकांत पेटे, निलेश शिंदे यांना मंगळवारी दुपारी सुमारे ८ ते १० फुटाची मगर नदी पात्रालगत दिसली. बराच वेळ मगर नदी काठावर पडून होती.
तालुक्यातील आटके परिसरातील पाचवड मळी नावाच्या शिवारात सोमवारी सकाळी गावातीलच एका शेतकऱ्यास मगरीचे दर्शन झाले होते.
मागील आठवड्यात मालखेड गावच्या हद्दीत नदी काठावर मगरीचे स्थानिक शेतकऱ्यांना दिसली होती.
या घटने पाठोपाठ कराड शहर आणि आटके येथे मगर दिसून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कराड शहराचे नदीकाठच्या गावात दररोज सकाळी स्थानिक शेकडो युवक तसेच ग्रामस्थ आंघोळीसाठी कृष्णा नदीत जात असतात.
त्यामुळे नदीकाठावर जाणाऱ्यांनी दक्षता घेण्याची गरज आहे.