औरंगाबाद : ९० हजारांची लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील सर्वेअरसह दाेघांना अटक | पुढारी

औरंगाबाद : ९० हजारांची लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील सर्वेअरसह दाेघांना अटक

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : जमिनीचा रेखांकन नकाशा तपासायचा आणि डिमार्केशन नकाशा तयार करून घेण्‍यासाठी पैठण भूमिअभिलेख कार्यलयातील सर्वेअरने ९० हजार रुपये लाच मागितली. विशेष म्हणजे, भूमिअभिलेख कार्यलयातील सर्वेअरच्या ठेकेदार भावालाच लाच स्वीकारली.  याप्रकरणी पैठण येथील भूमी अभिलेख कार्यालयातील सर्वेअर अनिल विष्णू सावंत (वय- ३७ ) आणि त्याचा भाऊ सचिन विष्णू सावंत (वय २४) अशी अटक केलेल्‍या संशयित आराेपींची नावे आहेत. औरंगाबाद येथील ‘एसीबी’ पथकाने ही ९ ऑगस्टला ही कारवाई केली.

तक्रारदार हे स्थापत्य अभियांत्रिकी सल्लागार आहेत. त्यांचेकडे आलेल्या पक्षकार यांने कृषक जमिनीचे अकृषक जमिनीत रूपांतर करण्यासाठी आणि जागेचा रेखांकन नकाशा बरोबर आहे की नाही? असे पाहून डिमार्केशन नकाशा तयार करून देण्यासाठी ९० हजार रुपयांची लाचेची मागणी केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कार्यवाही

यातील ४५ हजार रुपये यापूर्वी दिलेले आहेत. तर भूमी अभिलेख सर्वेअर अनिल यांनी आपले भाऊ सचिन सावंत यांचेकडे यातील उरलेली रक्कम देण्यास सांगितल्याचे कबूल केले. यानंतर औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यवाही केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रम्हदेव गावडे, रूपचंद वाघमारे, गणेश धोक्रट,
सुनील पाटील,  दिगंबर पाठक, विलास चव्हाण, चालक चांगदेव बागुल यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचलंत का? 

पाहा :  प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळतंच : विश्वास नांगरे -पाटील 

Back to top button