पाटण : पुढारी वृत्तसेवा ; कोयना धरण (Koyna Dam) पूर्वेकडील विभागात सिंचनासाठी पाण्याची मागणी झाल्याने कोयना धरण पायथा वीज गृहातील एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून पूर्वेकडे कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 1050 क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली.धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोयना धरणात सध्या एकूण 89.39 टी.एम.सी. इतका पाणीसाठा तर 2151.2 फूट पाणी
उंची आहे. सध्या सिंचनासाठी पूर्वेकडील विभागातील मागणी लक्षात घेऊन धरणातून सोमवारी दुपारी तीन वाजल्यानंतर प्रतिसेकंद 1050 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यावर धरण पायथा वीज गृहातून वीजनिर्मिती केली जात आहे. या पाण्यामुळे पूर्वेकडील कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
हेही वाचा ;