आज्ञाधारक पिढी होऊ लागलीय कालबाह्य

आज्ञाधारक पिढी होऊ लागलीय कालबाह्य
Published on
Updated on

कण्हेर : बाळू मोरे ; बदलत्या काळानुसार पारंपरिकता लोप पावत असून संस्कार व नीतीमूल्यांचाही र्‍हास होत चालला आहे. आता लहान मुले देवापुढे, देवघरात फिरकतच नाहीत. त्यामुळे पूर्वी होणारी शुभंकरोती, आई-वडिलांच्या, आजी-आजोबांचा घेतला जाणारा आशीर्वाद हे क्‍वचितच उरले आहे. वडीलधार्‍यांच्या आज्ञेत राहणारी पिढी कालबाह्य झाली असून मोबाईलमध्ये ती गुरफटली आहे. कोरोना काळामुळे ही समस्या आणखी जटिल झाली आहे.

भारतीय संस्कृती

आधुनिक भारताच्या निर्माणामध्ये भारतीय संस्कृतीला खूप महत्त्व आहे. जगभरातील सर्वश्रेष्ठ अशी भारतीय संस्कृती की ज्या संस्कृतीने अनेक विचारवंत थोर महापुरुष घडवले; परंतु 21 व्या शतकामध्ये बदलत्या काळामध्ये माणसाचे राहणीमानही बदललेे; परंतु हा बदल प्रणालीच्या दिशेने जरी असला तरी त्या प्रगतीमध्ये संस्कृती हरवत चालली आहे. तरुणी, तरुण या बदलामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात स्वतःला झोकून देत आहे की आधुनिक बदलत्या काळामध्ये तरुणाई मोबाईलमध्ये हरवून बसली आहे. कोरोनामुळे तर मोबाईलचा वापर प्रचंड वाढला आहे. कोरोनाच्या काळामुळे मुले मोबाईल घेऊन अभ्यासात गुरफटून गेली आहेत.

आज्ञाधारक पिढी : घटते आयुष्यमान

पालकही शाळेचे व अभ्यासाचे नको इतके ओझे त्यांच्यावर टाकत आहेत. कोरोनामुळे शाळांवर विपरीत परिणाम झाला असून मुले ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली मोबाईल घेऊन बसत होती. त्यामुळेच मैदानावर खेळणारी मुले आता अपवादानेच दिसत आहेत. कदाचित मुलांचा बुद्ध्यांक वाढला तरी त्यांचे आयुष्यमान मात्र घटत असल्याचे वास्तव चित्र आहे.पूर्वीसारखी गुरुकुलसारखी शिक्षणपद्धती उरली नाही. पाटीवरती श्री गणेशा करून आकडेमोड करणारी मुलं आता संगणकावर गणित सोडवू लागली आहेत. अंगात फाटकेतुटके कपडे घालून, ढिगळ लावून शिक्षणाचा धडा घेण्यासाठी जाणारी मुलं आता सुटाबुटात मोटारसायकलवरून शाळेत जात आहेत. यामुळे सगळंच कसं बदललेलं जाणवत आहे.

गृहिणींचे मोबाईलवेडही समस्यांचे कारण…

आता एकत्र जेवण नाही आणि त्यातून मिळणारे समाधानसुद्धा नाही. आधुनिक युगात पाश्‍चिमात्य संस्कृतीप्रमाणे अनेक घरांमध्ये जेवणसुद्धा डायनिंग टेबलवर तेही टीव्हीवरील मालिका व मोबाईलचा पगडा आहे. त्यामुळे जेवण कधी आटोपले हे सुद्धा कळत नाही. जेवणाचा सात्विकपणा त्यातून नष्ट होऊ लागला आहे. ताटात जेवण असतं मात्र त्या जेवणामध्ये सुरसपणा नाही ही सुद्धा मोठी शोकांतिका होऊ लागली आहे. जेवणातून मिळणार्‍या रज, सत्व, तम गुणांची ही जाणीव वाढत्या वयात विसरली आहे. गृहिणींचे मोबाईलवेडही अनेक समस्यांचे कारण बनू लागले आहे.

हेही वाचा ; 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news