पणजी; पुढारी वृत्तसेवा
कळंगुट येथील सोझा लोबो रेस्टॉरंट तोडफोड आणि प्राणघातक हल्ला प्रकरण हाताळण्यात कसूर दाखविल्या प्रकरणी कळंगुट पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक नालास्को रापोझ यांना निलंबित करण्यात आले आहे.
कळंगुट पोलिस स्थानकाच्या निरीक्षकपदाचा पदभार लक्षी आमोणकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मंगळवारी सर्वात जुन्या रेस्टॉरंटची म्हणजे सोझा लोबोची वादातून तोडफोड झाली. या हल्ल्यात काही कर्मचारी गंभीर जखमी झाले. मात्र, कळंगुट पोलिसांकडून या प्रकरणी तातडीने कोणतीही कारवाई झाली नाही.
जनक्षोभानंतरच मुख्यमंत्र्यांना दोषींवर कारवाईसाठी हस्तक्षेप करावा लागला. या प्रकरणाचा तपास आज सकाळी गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला.