चंद्रकांत जाधव : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा झेंडा फडकवणारे अण्णा गेले

चंद्रकांत जाधव : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा झेंडा फडकवणारे अण्णा गेले
चंद्रकांत जाधव : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा झेंडा फडकवणारे अण्णा गेले
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन; कोल्हापूर : काँग्रेसचे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे आज अकाली निधन झाले. त्यांची कारकिर्दी जरी अल्प ठरली पण या दोन वर्षांतील त्यांचं काम कोल्हापूरकरांच्या सदैव लक्षात राहाणार आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा झेंडा फडवणारे अण्णा आपल्यात नाहीत, ही बातमी पचवनं कोल्हापूरकरांना कठीण जात आहे.

२०१९ची विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसला सुरुवातीला उमेदवारही शोधावा लागत होता. शिवसेनेचे दोन वेळचे आमदार राजेश क्षीरसागर यांचं पारडं जड दिसत होते. त्यात कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ तर शिवसेनेचा बालेकिल्ला. शिवसेनेची पारंपरिक व्होट बँक भक्कम असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव होईल, असा फारसा कुणी विचार केला नव्हता.

काँग्रेसच्या उमेदवारीची माळ चंद्रकांत जाधव यांच्या गळ्यात पडली. भाऊ नगरसेवक असल्याने चंद्रकांत जाधव महापालिकेच्या राजकारणात सक्रीय होते. उद्योजक असल्याने उद्योजक आणि व्यावसायिक यांच्या समस्या सोडवण्यातही त्यांचा पुढाकार असायचा. शिवाय कोल्हापूर शहरातील तालीम संस्था, खेळाडू, तरुण मंडळ यांना ते सडळ हाताने मदत करत असतं. पण कोल्हापूर शहराची आमदारकी मिळवणं सोपं नव्हतं. पण जाधव यांनी नेटाने प्रचार केला. आताचे गृहराज्य मंत्री सतेज पाटील आणि तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांचे पाठबळ बरोबर होते.

क्षीरसागर सलग २ वेळा आमदार होते, त्यामुळे त्यांच्याविरोधात जनमत जात आहे हा अंदाज जाधव यांना आला होता, त्यांनी त्या पद्धतीने आपली यंत्रणा कार्यरत केली. ते मंगळवार पेठेतील असल्याने हा परिसर त्यांच्या पाठीशी राहिला. बघता बघता निवडणुकीची हवा फिरू लागली आणि जाधव यांनी १५ हजार मतांनी विजयी मिळवला.

आमदार झाल्यानंतर कोल्हापुरातील महापूर त्यानंतर कोरोनाचा उद्रेक अशा गंभीर स्थितीत त्यांना शहराचे नेतृत्व केले. स्वतः उद्योजक असल्याने उद्योगाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी कसोशीने केला. त्यांच्यातील अभ्यासू वृत्तीही ठळक दिसायची. कोल्हापुरातील राजकारणात नेहमीच टोकाची स्पर्धा असते. पण चंद्रकांत जाधव यांना सर्वच पक्षातील नेते आणि कार्यकर्ते यांच्याशी चांगले संबंध ठेवले होते. त्यामुळे विरोधकही त्यांच्याबद्दल चांगले बोलायचे.

चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने कोल्हापूरने एक अभ्यासू नेता गमावला आहे.

हेही वाचलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news