SATARA DCC BANK ELECTION : कोणत्याही निवडणुकीत यश-अपयश असतेच : अजित पवार
कोणत्याही निवडणुकीत यश-अपयश हे असतेच. सगळेच निवडणुकीत जिंकतात, असं नाही. सातारा जिल्हा बॅक निवडणूक पक्षीय नव्हती. सहकार क्षेत्रातील निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही हे सर्वांना माहितच आहे. स्थानिक पातळीवर तेथील आमदार, खासदार असे विविध पक्षातील लोकांनी पॅनल करुन निवडणुक लढवली होती, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत ( SATARA DCC BANK ELECTION ) आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, मी यासंदर्भात सातारा पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधला. या प्रकरणी पाच ते सहा जणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिस त्यांची चौकशी करीत आहेत, असे त्यांनी सांगितले.
सातारा जिल्हा बँकेवर ( SATARA DCC BANK ELECTION ) यापूर्वी लक्ष्मणराव पाटील, विलासराव पाटील उंडाळकर यांचे नेतृत्व होते. आता रामराजे निंबाळकर, शिवेंद्रराजे यांच्या नेतृत्वाखाली बँकेचे चांगली काम चालले आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, एकीकडे आपल्या पराभवाला आमदार शशिकांत शिंदे हे शिवेंद्रराजे यांना जबाबदार धरत असताना दुसरीकडे अजित पवार यांनी शिवेंद्रराजे यांचे कौतुक केलं आहे.