Satara Murder : साताऱ्यात सापडलेल्या 'त्या' युवकाचा मर्डरच; मृत बीड जिल्ह्यातील - पुढारी

Satara Murder : साताऱ्यात सापडलेल्या 'त्या' युवकाचा मर्डरच; मृत बीड जिल्ह्यातील

सातारा : पुढारी वृत्तसेवा

Satara Murder : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडी नजीक असलेल्या दगडाच्या खाणीत चार दिवसांपूर्वी पाण्यावर तरंगत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. ३५ वर्षीय युवकाचा हा मृतदेह असून अमोल डोंगरे (मूळ रा. बीड जिल्हा) असे त्याचे नाव आहे. अमोलचा खून झाला असून सातारा शहर पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत. दरम्यान, अमोल डोंगरे बेपत्ता असल्याबाबत सिंहगड, पुणे पोलिस ठाण्यात नोंद असल्याचे समोर आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहरालगत खिंडवाडीतील दगडाच्या खाणीमध्ये चार दिवसांपूर्वी एका युवकाचा मृतदेह काही नागरिकांना दिसला. त्यानंतर नागरिकांनी सातारा शहर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन खाणीतील पाण्यातून मृतदेह वर काढला. त्याच्या हातावर राणी असे गोंदलेले होते. पोलिसांनी त्याची ओळख पटविण्यासाठी जंगजंग पछाडले. मात्र त्यात अपयश होते.

अखेर मंगळवारी रात्री माहिती समोर येत गेली आणि पोलिसांनी वेगाने तपास केला. मृताची ओळख पटली असून त्याचे मारेकरी (Satara Murder) देखील समोर आले आहेत. दरम्यान, लवकरच पोलिस याबाबतची माहिती देणार आहेत.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : कोल्हापूरचा अंध पैलवान गाजवतोय मोठ-मोठी मैदानं | Story of Blind Wrestler

Back to top button