२६ वर्षांनंतर नेर तलावाचे जलपूजन आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते | पुढारी

२६ वर्षांनंतर नेर तलावाचे जलपूजन आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते

सातारा; पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील खटाव या दुष्काळी भागासाठी महत्वपूर्ण अशी असणारी जिहे-कटापूर ही योजनेचे गेल्या २६ वर्षांपासून धिम्या गतीने काम सुरू होते. अखेर आज २६ वर्षांनंतर नेर तलावाचे जलपूजन आमदार महेश शिंदे याच्या हस्ते करण्यात आले. नेर तलावात पाणी आल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

या योजनेचा फायदा खटाव तालुक्यातील दुष्काळी भागाला मोठया प्रमाणात होणार असल्याने या भागातील शेतकरी या योजनेकडे टक लावून बसले होते. या भागाचे तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे हे स्वतः जलसंपदा मंत्री असताना सुद्धा ही योजना पूर्ण होऊ शकली नव्हती; परंतु आज भल्या पहाटे या योजनेचा उदघाटन समारंभ कोरेगाव खटाव विधानसभेचे आमदार महेश शिंदे यांनी केले आहे.

आज मंगळवारी (दि. १९) रोजी आमदार शशिकांत शिंदे यांचा वाढदिवस असून त्या दिवशीच त्यांचे राजकीय विरोधक महेश शिंदेंनी या योजनेचे उदघाटन करून आमदार शशिकांत शिंदेंना भल्या पहाटे धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

या कार्यक्रमात आमदार महेश शिंदे यांनी जलपूजन केले. त्यावेळी त्यांचे समर्थक आणि कोरेगाव व खटाव तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचलं का? 

व्हिडिओ : अनंत अमुची ध्येयासक्ती : कोल्हापूरच्या कस्तुरी सावेकरने सर केले मनस्लू शिखर 

Back to top button