आर्यन खानसाठी शिवसेना सुप्रीम कोर्टात; ‘एसीबी’कडून मूलभूत अधिकारांचे हनन | पुढारी

आर्यन खानसाठी शिवसेना सुप्रीम कोर्टात; 'एसीबी'कडून मूलभूत अधिकारांचे हनन

पुढारी ऑनलाईन डेस्क

मुंबईतील समुद्रातील क्रूजवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटक केलेल्या आर्यन खानसाठी शिवसेना सुप्रीम कोर्टात गेली आहे. आर्यनच्या मूलभूत अधिकारांचे हनन होत असल्याचे याचिकेत म्हटलं आहे. मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हायकोर्टातील न्यायाधिशाांना आदेश देण्याची मागणीही या याचिकेत केली आहे.

संविधानातील परिच्छेद ३२ नुसार याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी दाखल केलेल्या याचिकेत सरन्यायाधीश रमणा यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

आर्यन खानसाठी शिवसेना सुप्रीम कोर्टात

गेल्या दोन वर्षांपासून एनसीबी पूर्वग्रह दृष्टीकोनातून पक्षपाती कारवाया करत आहे. चित्रपट क्षेत्रातील व्यक्ती, मॉडेल आणि सेलिब्रेटींना त्रास देत आहे.संविधानातील परिच्छेद ३२ नुसार सुप्रीम कोर्ट आणि सरन्यायाधिशांच्या अधिकारांत याबाबत हस्तक्षेप स्वीकारार्ह आहे. संविधानातील भाग तीननुसार नागरिकांना काही अधिकार दिले आहेत, त्याचे उल्लंघन एनसीबी करत आहे.

याचिकेत म्हटले आहे, विशेष एनडीपीएस कोर्टाकडून आर्यन खानसही अन्य आरोपींच्या जामिनाबाबत सार्वजनिक सुट्यांचे कारण देत सुनावणी टाळली आहे. हा संशयित आरोपींचा मोठा अपमान आहे. आर्यन खानला बेकायदा १७ दिवस जेलमध्ये ठेवले आहे. हे संविधानाच्या विरोधात आहे आणि स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराची अवहेलना आहे.

आर्यन खान म्हणाला…

क्रूज पार्टीत अटक केलेल्या आर्यन खानचे जेलमध्ये काऊन्सिलिंग सुरू असून त्यादरम्यान तो म्हणाला, मी चांगला नागरिक बनेन आणि देशाची सेवा करेन. एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांनी स्वत: त्याचे काउन्सिलिंग केले. वानखेडे यांनी त्याला नशेपासून दूर रहायला सांगितले. वानखेडे संशयिताना स्वत: काऊन्सिलिंग करतरात. कस्टडीदरम्यान तीन तास त्यासाठी दिले जातात. यासाठी मुंबईतील इस्कॉन मंदिराचे पुजारी आणि मौलानांची मदत घेतली जाते. याशिवाय मानसोपचार तज्ज्ञांचाही समावेश असतो.

आर्यन खानचा मुक्‍काम २० ऑक्‍टोबरपर्यंत आर्थर रोड कारागृहातच

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबईच्या एनडीपीसी (NDPC) ने न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्‍यामुळे आता आर्यन खानचा मुक्‍काम २० ऑक्‍टोबरपर्यंत आर्थर रोड कारागृहातच राहणार आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर अनेक स्टार्सकडून अनेक शाहरूख खानसह आर्यनला पाठिंबा देत आहेत.

हेही वाचलं का? 

Back to top button