कण्हेर धरण : पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस; धरणातून तिसऱ्यांदा पाणी सोडले - पुढारी

कण्हेर धरण : पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस; धरणातून तिसऱ्यांदा पाणी सोडले

कण्हेर; पुढारी वृत्तसेवा : कण्हेर धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांमध्ये दोन ते तीन वेळा जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे कण्हेर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे निर्धारित जलपातळी राखण्यासाठी धरणाच्या सांडव्यावरून वेण्णा नदी पात्रात तिसऱ्यांदा ६०० क्युसेक पाणी दोन दरवाजातून सोडण्यात आले आहे.

सध्या कण्हेर धरणाची पाणीपातळी ६९०.७८ मीटर झाली असून, धरण 100 टक्के भरले आहे. धरण व्यवस्थापनेच्या नियोजनानुसार पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी मंगळवारी सकाळी 9 वाजता धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण पाहून धरण पातळी स्थिर ठेवण्यासाठी धरणातून पाणी सोडले आहे.

धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याचे येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास धरणाच्या दरवाज्यातून सोडण्यात येणारे पाणी आवश्यकतेनूसार बंद केले जाईल, अशी माहिती धरण व्यवस्थापनाने दिली. परतीचा पाऊस धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button