सातारा : सोयाबीनची ३७ पोती चोरीला | पुढारी

सातारा : सोयाबीनची ३७ पोती चोरीला

वेणेगाव: पुढारी वृत्तसेवा : खोजेवाडी ता. सातारा गावच्या हद्दीत खोजेवाडी ते जावळवाडी रस्त्यावर एका पत्र्याच्या शेडमधील ठेवलेल्या दुकानातून १ लाख ६१ हजार ८७५ रुपयांची सोयाबीनची ३७ पोती चोरीस गेली आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. याप्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोयाबीनची १२५ पोती ठेवण्यात आली होती. यामधील ३७ पोती अज्ञात चोरट्यांनी लांबवली. या घटनेनंतर सपोनि चेतन मछले यांच्या. मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने चौकशी करण्यास सुरूवात केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून श्वान पथक व उसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. याबाबत विक्रम बाबासाहेब घोरपडे खोजेवडी येथे एका दुकानात यांनी फिर्याद दिली आहे.

Back to top button