

कराड; पुढारी वृत्तसेवा : एसटीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलीस दलातील पोलिसावर कराड शहर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. महेश मारुती मगदूम असे त्याचे नाव आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. हा गुन्हा बोरगाव हद्दीत घडल्यामुळे तपासासाठी बोरगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी महेश मगदूम हा कोल्हापूर पोलीस दलातील स्पोर्ट्समन आहे. तो कबड्डीपटू असून प्रो कबड्डी लीगमध्ये देखील त्याची निवड झालेली होती. त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलीस दलाची मोठी नाचक्की झाली आहे. साताऱ्यात सुरू असलेल्या पोलीस क्रीडा स्पर्धेचा सोमवारी समारोप झाला. पोलिसानेच केलेल्या संतापजनक कृत्यामुळे क्रीडा स्पर्धेला देखील गालबोट लागले आहे.
हेही वाचा :